Posts

Showing posts from 2022

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 16 - डॉ. श्री. आशुतोष भट सर - 09-01-2022

Image
व्यक्ती आणि वल्ली –अंक - 16 -  डॉ. श्री. आशुतोष भट सर - 09-01-2022 ‘ गुरू :  ब्रह्मा   गुरू :  विष्णू ,  गुरू :  देवो   महेश्वरा , गुरू :  साक्षात   परब्रम्ह ,  तस्मै :  श्री   गुरूवे   नम : !  ‘ गुरू : ब्रह्मा गुरू : विष्णू , गुरू : देवो महेश्वरा , गुरू : साक्षात परब्रम्ह , तस्मै : श्री गुरूवे नम : ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक . शिक्षण असे   क्षेत्र आहे , जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते . कोणतही   शिक्षण   हे   पुस्तक वाचून शिकता येत असल   तरी त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते . गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो . आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार , संस्कृती , परंपरा , चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात . त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे .  डॉ. श्री. आशुतोष भट सर   त...