Posts

Showing posts from June, 2020

भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे - © सुयोग शहा

Image
भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंदिरे © सुयोग शहा  हिंदू धर्मात ३३ कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यातील गावात सुद्धा किमान दोन तीन देवळे आढळतात. देवदेवतांची मंदिरे उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे आणि त्याकाळी कोणत्याही सुविधा आणि आधुनिक हत्यारे नसतानाही अत्यंत भव्य अशी मंदिरे येथे बांधली गेली. त्यांचा इतिहास अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासूनही सापडतो. कांही मंदिरे महाभारत, रामायण कालीन असल्याचेही सांगितले जाते. भारतातील अशाच हजारो वर्षे जुन्या प्राचीन आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मंदिरांची ही संग्रहित फोटोंच्या रूपाने माहिती.  अवघा भारत देश हा मंदिरस्थापत्याने श्रीमंत आहे. कुठल्याही राज्यात जावे तिथे एखादे तरी देखणे, सुंदर मंदिर आपले स्वागत नक्कीच करेल. प्राचीन भारतात मंदिरस्थापत्य बहराला आलेले होते. प्रत्येक शिल्पसमृद्ध मंदिर उभारणीमागे अनेक कलाकारांनी आपले प्राण ओतलेले आहेत. त्या कलाकारांच्या पाठीशी बलाढय़ राजसत्ता उभ्या होत्या, त्यामुळेच हे देखणे वैभव आजही आपल्यासमोर मोठय़ा दिमाखात उभे आहे. मंदिरामागे दडलेले रहस्य, त्यावर केलेले शास...