व्यक्ती आणि वल्ली – अंक - ८ बापजन्म - © सुयोग शहा
बाप हा बापच असतो !!! बापजन्म झाल्याशिवाय कळत नाही...
© सुयोग शहा
माझे बाबा आणि आई यांनी मला लहानपणापासून अगदी फुलासारखे जपून माझे संगोपन केले आणि
मला मोठे केले. मी वकील होई पर्यंत आणि आज पर्यंत खऱ्या अर्थाने आयुष्यात कष्ट काय असतात हे मी
बघितलेच नाहीत. आज आयुष्यात मी जे काही आहे त्याचे सर्व श्रेय हे मी माझे आईबाबा यांना अर्पण करतोबाबा या शब्दात किती ताकद आणि कष्ट करण्याची जिद्द असते हे बाबा झाल्याशिवाय नाही कळत.
लहानपणापासून आजपर्यंत स्वतः कष्ट सहन करून स्वतःचे जीवाला चटके देऊन आज पर्यंत आमच्या सुखासाठी झटणारा व्यक्ती म्हणजे बाबा. आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींपासून प्रत्येक क्षणा क्षणा साठी माझ्या आयुष्याचे निर्माते म्हणून फक्त एकच व्यक्ती आणि ते म्हणजे माझे बाबा...मला त्यांचा अभिमान आहे......
आज आयुष्यात जे काही आहे ते सर्व काही आई वडिलांना अर्पण करतो -
देवाने दिधली लोचने तुला पाहण्या,
मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या.
मूर्ती दिसे तुझी, वीणा वाजते रे कानी,
जशी भास्कराची वाट पाहते रजनी…
पहाटेस या सांगून बघ ना जरा थांबण्या…
हृदयावरती नाम तुझे मी कधीच कोरले,
मेंदीच्या गंधात भारले,
भेटीचे सोहळे,
अवघड वाटे आता जरा ही लाज राखण्या…
' फादर्स डे ' चा इतिहास...
फादर्स डे म्हणजेच आपल्या मराठीत सांगायचं तर, पितृदिन. हा 21 जून रोजी साजरा होत आहे. काही लोक या दिवसाकडे मदर्स डे म्हणजेच मातृदिनाला पूरक म्हणूनही पाहतात. अपवाद वगळता जगातील प्रत्येक व्यक्तिच्या त्याच्या स्वत:च्या म्हणून यशाच्या मागे खंबीर सूत्रधार म्हणजे प्रत्येकाचे बाबा. पण,आयत्या वेळी होणारा उद्धार वगळता बाबा हा यशाचा पाठीराखा असूनही अनेकदा पडद्यामागचा सूत्रधाराच ठरतो. हे क्रेडीट अनेकदा आईला मिळते. अर्थात ते मिळायलाही पाहिजे. पण, त्या तूलनेत बाबा मात्र या क्रेडीटपासून काहीसे उपेक्षीतच राहतात. अशा वेळी फादर्स डे ( पितृदिन ) साजरा करुन आपल्या पडद्यामागच्या हिरोला शुभेच्छा देणं किंवा त्याच्या कामाचे कौतुक करणं कोणाला नाही आवडणार. आपल्यासाठी आणि आपल्या सुखासाठी रोजच झटणारया या बापाचा तसे म्हंटले तर खऱ्या अर्थाने रोजच फादर्स डे असतो.
प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात. भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात. बाबा म्हणता म्हणता मी कधी बाबा झालो हेच कळाले नाही.
फादर्स डे साजरा करण्याचा उद्देश वडिलांची कृतज्ञता व्यक्त करणे हाच आहे.
बाबा ,जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात.
बाबा माझ्या तुमच्या विषयीच्या काही भावना मी या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे....
हम न समझे थे बात इतनी सी, ख्वाब शीसे के दुनिया पत्थर की,
हम न समझे थे बात इतनी सी, ख्वाब शीसे के दुनिया पत्थर की,
हम न समझे थे बात इतनी सी.....
आरज़ू हमने की तो हम पाए,आरज़ू हमने की तोह हम पाये,
रोशनी साथ लाई थी साये, साये गहरे थे रौशनी हलकी,
हम न समझे थे बात इतनी सी, ख्वाब शीसे के दुनिया पत्थर की...
बाप हा बापच असतो !!! बापजन्म झाल्याशिवाय कळत नाही...
© सुयोग शहा













Wow
ReplyDelete