व्यक्ती आणि वल्ली !!! अंक -४ सु-शांत !!! या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे...
आत्महत्या ( क्षणांत संपणार आयुष्य )
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही !!!
आज एक बातमी वाचली अत्यंत दुःखदायक आहे प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह यानी राहत्या घरी आत्महत्या केली.
ही बातमी वाचल्यानंतर मलाच नाही तर बऱ्याच जणांना एक धक्का बसला असेल की याने आत्महत्या का केली असेल ?
कारण त्याच त्यालाच ठाऊक असेल ? आज मला काही गोष्टी इथे मांडावं असं वाटतं म्हणून केलेला हा एक छोटासा प्रयत्न.
🔶 बऱ्याच लोकांना आज असं वाटतं की आत्महत्या केली म्हणजे सगळे रस्ते मोकळे होतात.
🔶 काहीना वाटतं की आपल्यामुळे दुसऱ्याचा भावनिक छळ होतो म्हणून आपण आत्महत्या करावी.
🔶 काहीना वाटतं की आपण आता आयुष्याचा भार आणि संसाराचा गाडा झेलू शकत नाही.
🔶 काहीना वाटतं की आपल्यावर आता संकट कोसळणार म्हणून आधीच आपण पाय काढून घ्यावा.
➡️ अशी बरीचसी कारण असू शकतात.
असं काही ऐकलं की माझ्या मनाला एकच प्रश्न सतावतो.
" आत्महत्या करुन आपल्याला काय साध्य होत. "
ज्या गोष्टी मुळे आपण आत्महत्या करतो त्या गोष्टी बदलणार आहे का ?
पण त्या गोष्टी आपण स्वत: बदलून आयुष्याला नवीन आकार द्यायला हवा. तिथून आपण मागे हटावं का ?
मिळालेल्या आयुष्यात अनेक चढ-उतार असतात ते पार करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करावा. मरण आजही आपल्या दारात आहे आणि उद्याही असणारच, पण आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा नेहमी उपभोग घ्यावा.आज कुणी सांगू शकत नाही की उद्याचा दिवस कसा असू शकतो. पण उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपल्याला आज जगावं लागेल. जोपर्यंत माणसाला ज्ञानप्राप्ती नव्हती तोपर्यंत माणसांने कधी आत्महत्या केली नाही कारण त्याला फक्त जगण्याचा आनंद घ्यायची इच्छा होती आणि आता माणसांकडे ज्ञान असुन ही तो पळणारी वाट शोधत असतो.
या जगात आज माणूस सोडून सहसा कोणतेही प्राणी आत्महत्या करण्याचा विचार करत नाही कारण त्यांना एकच गोष्ट ठाऊक असते की या जगण्याचा आनंद आपण लुटावा.
पण आज माणसांकडे अहंकार आणि हाव या दोन गोष्टी इतक्या आहेत की अपमान झाला किंवा एखादी गोष्ट त्याला मिळाली नाही तरी तो आत्महत्येचं पाऊल उचलतो.
जोपर्यंत अहंकार आणि हाव या दोन गोष्टी माणसांपासून दूर जाणार नाही तोपर्यंत माणसांला कसं जगावं हे कधी कळणार नाही. आज लोकांना यश संपादन करण्याची खूप जास्त घाई झाली आहे असे देखील वाटते.
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी..
आयुष्य छान आहे,थोडे लहान आहे......
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे...
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे.....
उचलून घे हवेते,दुनिया दुकानआहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे."
सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"......
आयुष्याच्या वाटेवर जगण्याची एक वेगळी मजा असते
आयुष्य कसंही जगा पण त्याला जिवंत ठेवणं आपल्या हाती असते.त्यासाठी आत्महत्या हा पर्याय कधी नसावा.
आपल्या आयुष्यातला एक सुपरहिट फॉर्मुला तुम्हाला सांगतो "ज़िन्दगी को हमेशा मुस्कुरा के गुजारो"……!!
-: आयुष्य :-
आयुष्याची अवखळ असली वाट
तरी चालण्याची मजा न्यारी असते.
मातीत पाषांणावर कोवळ्या फुलाला
धडपड करत जगण्याची आस असते.
झुळुक बनून कधी वादळात वारा वाहतो
तरी गंध पसरवायला त्याला ओढ असते.
सागरात अडकली नाव तरी हटत नाही
किनारा गाठायला लहरीत ती वाहत असते.
आयुष्याच्या सुखदुःखाचे झरे पाझरले
तरी जगण्यासाठी मुक्या जीवांची जात असते.
" शिकवे मुझे भी जिंदगी से है साहब
पर मौज में जीता हूँ... इसलिए शिकायते नहीं करता "
©️ सुयोग शहा
मौज में जीता हूँ... इसलिए शिकायते नहीं करता "
ReplyDeleteखरं आहे.
Thanks a lot...
ReplyDelete