Posts

Showing posts from July, 2020

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा

Image
  दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा   आज आपल्यापर्यंत येणाऱ्या बहुतांश बातम्या काय सांगतात ? पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभर संपूर्ण ‘लॉकडाऊन ’ जाहीर केल्यानंतर ‘संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान ’ ही उक्ती डोळ्यांपुढे ठेवून कोरोना आपत्ती काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकांना मदतीसाठी उतरण्याचे आवाहन केले आणि देशभर सेवायज्ञ सुरु झाला. कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवी संस्थांनी काम केलं. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र शिस्तबद्ध योजना आणि अंमलबजावणीमुळे धारावीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आह...

व्यक्ती आणि वल्ली –अंक - ९ माझे गुरू कै. प्राचार्य श्री. सुहास काणे सर © सुयोग शहा

Image
व्यक्ती आणि वल्ली –अंक - ९ माझे गुरू कै. प्राचार्य श्री. सुहास काणे सर © सुयोग शहा गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. वकिलीचा व्यवसाय आणि वकिलीचे शिक्षण असे  क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते. कोणताही कायदा हा पुस्तक वाचून शिकता येत असला तरी त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला प्रत्येक टप्प्यावर चांगले गुरू मिळत गेले, हे मी माझे भ...