दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा
दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा आज आपल्यापर्यंत येणाऱ्या बहुतांश बातम्या काय सांगतात ? पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभर संपूर्ण ‘लॉकडाऊन ’ जाहीर केल्यानंतर ‘संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान ’ ही उक्ती डोळ्यांपुढे ठेवून कोरोना आपत्ती काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकांना मदतीसाठी उतरण्याचे आवाहन केले आणि देशभर सेवायज्ञ सुरु झाला. कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवी संस्थांनी काम केलं. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र शिस्तबद्ध योजना आणि अंमलबजावणीमुळे धारावीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आह...