दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा


 

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...! © सुयोग शहा 

आज आपल्यापर्यंत येणाऱ्या बहुतांश बातम्या काय सांगतात ?

पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी देशभर संपूर्ण ‘लॉकडाऊनजाहीर केल्यानंतर ‘संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान ही उक्ती डोळ्यांपुढे ठेवून कोरोना आपत्ती काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकांना मदतीसाठी उतरण्याचे आवाहन केले आणि देशभर सेवायज्ञ सुरु झाला. कोणताही गाजावाजा न करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वयंसेवी संस्थांनी काम केलं. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत देखील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र शिस्तबद्ध योजना आणि अंमलबजावणीमुळे धारावीत कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत गेला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कोरोना आपत्ती काळात कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉइज यांची कमी असल्याने कामाचा प्रचंड ताण आहे. त्यात सिविल हॉस्पिटल मध्ये मनुष्य बळ अपुरे पडत असल्याने संघाला एका महत्वाच्या गोष्टीसाठी पाचारण करण्यात आले. अनेक सामाजिक संस्था, सोशल ग्रुप्स असून देखील संघावर विश्वास दाखवण्यात आला, कशासाठी ? तर कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या अंतिम संस्काराच्या कार्यासाठी. संघ हे काम पूर्ण जबाबदारीने आणि निर्विघ्नपणे करू शकेल ही खात्री असल्यानेच हे कार्य संघाकडे आले. अनेक लोक जे कोरोना मुळे मृत्युमुखी पडले आहेत त्या लोकांना त्यांचे नातेवाईकांना त्यांचा अंतविधी करणे शक्य नाही अश्या सर्व मृतदेहांचे अंत्यसंस्कार तसेच परिस्थिती ने बेवारस ठरवलेले मृतदेह ज्यांचे पासून नातेवाईक देखील दूर गेले असताना, आपल्या परिवाराची चिंता न करता स्वतः क्वारंटाईनं होवून या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते करीत आहेत त्याहून अधिक पुण्याचे काम दुसरे काय असू शकते.

कोरोना वॉर्डमधून मृतदेह घेऊन त्याचा विद्युतदाहिनीत अंतिम संस्कार करण्यापर्यंतचा प्रवास या दरम्यान स्वयंसेवकांच्या मनात काय चाललं असेल हा एक खूप मोठा प्रश्न आपल्या समोर येतो ? रोजच्या रोज अनेक मृतदेहांवरच्या अंतिम संस्काराची सोय करणाऱ्या अमरधाममधील कर्मचाऱ्यांनासुद्धा सलाम आणि या संपूर्ण कार्यामध्ये त्यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते.  कोरोना चे संकट काळात संघाचे कार्यकर्ते म्हणून कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे अंतविधी व दफनविधी करण्याचे कार्य हे संघाचे कार्य आणि समाजभान असलेले संस्कार यांची जाणीवपुर्वकपणे निस्वार्थी पणे करीत आहेत.

श्री. बा.भ. बोरकर यांनी लिहिलेली "तेथे कर माझे जुळती" ही कविता अतिशय अर्थसंपन्न आहे, वाचकालाही समृद्ध करणारी आहे. आज ही कविता मी आपल्यासाठी येथे देत आहे आणि सोबतीला या कवितेचे गीतरूप देखील !

दिव्यत्वाची जेथे प्रचिती

तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥

गाळुनिया भाळीचे मोती

हरिकृपेचे मळे उगवती

जलदांपरी येऊनिया जाती

जग ज्यांची न करी गणती ॥१॥

यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर

घडिले मानवतेचे मंदिर

परि जयांच्या दहनभूमिवर

नाही चिरा नाही  पणती ॥२॥

जिथे विपत्ती जाळी उजळी

निसर्ग-लीला निळी काजळी

कथुनि कायसे काळिज निखळी

एकाची सगळी वसती ॥३॥

मध्यरात्रि नभघुमटाखाली

शांतिशिरी तम चवया ढाळी

त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी

एकांगी डोळे भरती ॥४॥

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती...!

अश्या या सर्व बातम्या रोज कानावर पडतात आणि पेपर मध्य वाचायला मिळतात आणि अश्या वेळी आपोआप अशाप्रकारे समाजकार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व कार्यकर्ते यांना पाहिले, की हात आपोआप जोडले जातात " दिव्यत्वाची जेथे प्रचिती ,तेथे कर माझे जुळती."

 

© सुयोग शहा

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 13 Dr. Yatindra Dube Sir