व्यक्ती आणि वल्ली –अंक - ९ माझे गुरू कै. प्राचार्य श्री. सुहास काणे सर © सुयोग शहा
व्यक्ती आणि वल्ली –अंक - ९ माझे गुरू कै. प्राचार्य श्री. सुहास काणे सर © सुयोग शहा
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. वकिलीचा व्यवसाय आणि वकिलीचे शिक्षण असे क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते. कोणताही कायदा हा पुस्तक वाचून शिकता येत असला तरी त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला प्रत्येक टप्प्यावर चांगले गुरू मिळत गेले, हे मी माझे भाग्य समजतो.
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात.
“The importance of education is not only in knowledge and skill but it is to help us to live with others.”
आज माणूस एकमेकांपासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते.आपल्या भारतीय संस्कृतीत देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे त्यापेक्षा थोडं अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.
“आज गुरुपौर्णिमा” माझ्या जीवनातील माझे गुरु, एन. बी. टी. लॉ कॉलेज चे माजी प्राचार्य कै. श्री सुहास काणे सर यांना स्मरण करून त्यांना वंदन करून माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे गुरु यांचे विषयी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या भावना व्यक्त करण्याचा एक निर्मळ प्रयत्न करीत आहे. आज गुरुपुर्णिमेच्या निम्मिताने मला प्राचार्य काणे सरांची प्रकर्षाने खूप आठवण होत आहे. सर तुमची कमी मला आज भासत आहे कारण तुमच्यामुळे मी घडलो आहे तुमच्यासमोर मी नतमस्तक झालो आहे मला आर्शिवाद द्या ही माझी इच्छा आहे.
प्राचार्य काणे सरांबद्दल बोलायचे झाले, तर शब्दही अपुरे पडतील, दैवी व्यक्तिमत्त्व असा आम्हा शिष्यांना अनुभव यायचा. काणे सर हे अतिशय चांगले गुरू होते. ते कधी-कधी खूप बोलायचे नाहीत, जे बोलायचे ते अत्यंत मुद्देसूद पणे असायचे. त्यात खूप अर्थ सामावलेला असायचा. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्वितीय होते. लोकांशी जसे संवाद साधायचे, त्यामुळे कुणीही येऊन त्यांच्याशी बोलू शकायचे. ज्यांना कायदा माहीत आहे त्यांना आणि ज्यांना माहीत नाही, त्यांनाही समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी कायदा शिकवला आहे. त्यांच्याबरोबर राहाणे, शिकणे त्यांना बघणे हा कधिही विसरता न येण्यासारखा अनुभव आहे.
आमचे काणे सर हे सदैव हसतमुख असलेले व्यक्तिमत्त्व होते. अतिशय मनममिळाऊ स्वभाव आणि साध्या राहणीमानामुळे ते चटकन सगळ्यांना आपलेसे करीत. न्यायसंस्थेची स्वायत्तता राखणे, लोकांचा या संस्थेवरील विश्वास दृढ करणे, ही आव्हाने मोठी आहेत. काणे सर हे यांनी त्यांच्या विद्वत्तेची छाप आमच्यावर पाडलेली आहे यात शंका नाही. आज आपण बघतो, की अनेक मुले शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर, आई, वडील, देश हे सगळे सोडून परदेशात जातात. तिथेच आपल्याला करिअर करता येईल, अशी त्यांची भावना झाली आहे. त्या सगळ्या मुलांना सांगावसे वाटते की कुशाग्र बुद्धी, ध्येय आणि परिश्रमाची जोड असली, की भारतात राहूनही मोठ्यात मोठे यश संपादन करता येते. भारतातही कर्तृत्व गाजविण्याच्या भरपूर संधी आहेत. काणे सर हे याचे सार्थ उदाहरण आहे. सामाजिक बांधीलकीची जाणीव, विध्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था, सहकारी वकिलांच्या समस्या सोडविण्यासाठी धडपड, अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ते ओळखले जात असत. आज संपूर्ण भारतात काणे सरांचे विध्यार्थी आहेत आणि मी देखील सरांचा एक आवडता विध्यार्थी असल्याचा मला खूप अभिमान आहे.
एन. बी. टी. लॉ कॉलेज चे माजी प्राचार्य, ज्येष्ठ विधीज्ञ कै. श्री सुहास काणे सर यांचे निधन ही शिक्षण, कायदा आणि न्यायालयीन अतिशय क्लेशकारक आणि दु:खद घटना होती. त्यांच्यासारखी व्यक्ती ही केवळ एक वकील वा कायदा यांची अभ्यासक नसते, तर ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञदेखील असते. वकिलीच्या क्षेत्रात अनेक वर्षे घालवली की ज्येष्ठ वा सीनिअर म्हणून मिरवता येते. मात्र काणे सरांसारखी उंची साऱ्यांनाच गाठता येत नाही. त्यांच्यासारखा ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, अभ्यासक व परिपक्व असा वकील निराळाच असतो. त्यांचा आवाका आणि विविध कायद्यांवरील त्यांची पकड ही स्तिमित करणारी होती. कुठल्याही दर्जेदार आणि चतुरस्र व्यावसायिकाचा त्या- त्या व्यवसायात आणि समाजात वेगळाच दरारा व दबदबा असतो. तो तर काणे सरांचा होताच; पण त्यांच्या व्यावसायिकतेला नीतिमत्तेची आणि सामाजिक निष्ठेचीही जोड होती. ५० वर्षांहून अधिक काळ या समाजाला उत्तम वकील देण्याचे कार्य काणे सरांनी केले आहे. त्यामुळेच वकिली म्हणजे केवळ पैसा, नाव मिळवणे नाही, तर आपल्या कामाचा दर्जा वाढविणे आणि त्यासोबत कामाचा ठसा व छाप उमटविणे; की त्यांचे येथे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे वकिली व्यवसायात पिढय़ान् पिढय़ा त्यामुळे आपले जीवन, कार्य आणि उद्योग यांचे नियोजन करू शकतात, यावर त्यांचा विश्वास होता.
आज गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा दिवस. गुरु स्मरण तर रोजच होत असतं कारण त्यांचे आपल्यावर असलेले अनंत उपकार. खर तर नुसत्या पुजनाने किंवा स्मरणाने या उपकारांची परतफेड होणे कदापि शक्य नाही. पण तरी देखिल दिनमानाचे औचित्य साधुन माझे गुरुवर्य असलेले काणे सरांना वाहिलेली ही आदरांजली.
त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. मात्र, किती लिहावे यास मर्यादा आहे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
© सुयोग शहा
गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
ReplyDeleteबलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।।
गुरू बिन ज्ञान न उपजै, गुरू बिन मिलै न मोष।
गुरू बिन लखै न सत्य को गुरू बिन मिटै न दोष।।
गुरू पारस को अन्तरो, जानत हैं सब संत।
वह लोहा कंचन करे, ये करि लेय महंत।।