व्यक्ती आणि वल्ली !!! - अंक -१ आर्किटेक्ट श्री.सागर काबरे.
व्यक्ती आणि वल्ली !!! व्यक्ती आणि वल्ली !!! - आर्किटेक्ट श्री.सागर काबरे. एक रंग माझा एक रंग तुझा !!! बेरंग आयुष्यात उधळू या रंग आपण दोघे हा उत्सव आहे रंगाचा एक रंग माझा एक रंग तुझा !!! आज दिनांक २१/०५/२०२० रोजी आर्किटेक्ट श्री.सागर काबरे यांचे सोबत सकाळी ६.३० वाजता भटकंतीची सुरुवात केली. सुरुवातीला प्लॅन होता तो गोदा पार्क येथे जाऊन निसर्ग सौंदर्य बघायचे आणि मनमुराद फोटोग्राफी करायची. प्लॅन अगदी सहज ठरला होता आणि लॉक डाउन असल्यामुळे विशेष चर्चा करायची नाही. सकाळी लवकर उठणे हा माझा नित्यक्रम आहे पण सागर भाई सकाळी लवकर उठतील आणि फोन करतील यावर माझा विश्वास नव्हता. ठरल्याप्रमाणे चक्क सागर भाईंचा फोन सकाळी ६.३० वाजता फोन आला आणि मी तयार असल्याने पुढच्या ५ मिनिटात सागर भाई यांचे कडे दाखल झालो. सागर भाई आणि त्यांचा डी. एस. एल.आर कडक तयार होते. वाट शोधत शोधत आम्ही दोघेच पोचलो गोदापार्क वर आणि सुरू झाली आमच्या प्रवासाची. हजारो पक्षांचा किलबिलाट, नदीचे अप्रतिम सौदर्य आणि त्यात सागर भाई यांनी गळ्यात मारलेला त्यांचा डी.एस.एल.आर..... सुरवातीला घाबरत घाबरत फोटो काढत होतो पण डी.एस.ए...