व्यक्ती आणि वल्ली !!! - अंक -१ आर्किटेक्ट श्री.सागर काबरे.

व्यक्ती आणि वल्ली !!!

व्यक्ती आणि वल्ली !!! - आर्किटेक्ट श्री.सागर काबरे.


एक रंग माझा एक रंग तुझा !!! बेरंग आयुष्यात उधळू या रंग आपण दोघे हा उत्सव आहे रंगाचा एक रंग माझा एक रंग तुझा !!!

 

आज दिनांक २१/०५/२०२० रोजी आर्किटेक्ट श्री.सागर काबरे यांचे सोबत सकाळी ६.३० वाजता भटकंतीची सुरुवात केली. सुरुवातीला प्लॅन होता तो गोदा पार्क येथे जाऊन निसर्ग सौंदर्य बघायचे आणि मनमुराद फोटोग्राफी करायची. प्लॅन अगदी सहज ठरला होता आणि लॉक डाउन असल्यामुळे विशेष चर्चा करायची नाही. सकाळी लवकर उठणे हा माझा नित्यक्रम आहे पण सागर भाई सकाळी लवकर उठतील आणि फोन करतील यावर माझा विश्वास नव्हता. ठरल्याप्रमाणे चक्क सागर भाईंचा फोन सकाळी ६.३० वाजता फोन आला आणि मी तयार असल्याने पुढच्या ५ मिनिटात सागर भाई यांचे कडे दाखल झालो. सागर भाई आणि त्यांचा डी. एस. एल.आर कडक तयार होते. वाट शोधत शोधत आम्ही दोघेच पोचलो गोदापार्क वर आणि सुरू झाली आमच्या प्रवासाची. हजारो पक्षांचा किलबिलाट, नदीचे अप्रतिम सौदर्य आणि त्यात सागर भाई यांनी गळ्यात मारलेला त्यांचा डी.एस.एल.आर..... सुरवातीला घाबरत घाबरत फोटो काढत होतो पण डी.एस.एल.आर मधुन आत्मविश्वासाने फोटो काढणे,पक्षी हेरणे,त्यांचे निरीक्षण करणे,त्यांना योग्य रीतीने फोटो मध्ये कैद करणे हे सर्व मला आज सागर भाई यांनी उत्तम रीतीने शिकवले.

 


माझ्यासाठी असलेली सर्वात कठीण आणि अवघड गोष्ट आहे ज्यावर कदाचित तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण आज मी तसा खूप शांत होतो, कारण सागर भाई यांच्या कडून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व समजून घेण्यात मला अधिक रस येत होता. व्यवसायाने प्रसिद्ध आर्किटेक्ट म्हणून आपल्याला सागर भाई माहीत आहेतच पण एक कलाकार म्हणून आज त्यांची नव्याने ओळख झाली. मनमुराद फोटोग्राफी करून आम्ही सागर भाई यांचे घरी आलो आणि आमची सुरुवात झाली तीन कप चहाने. सागर भाई यांचे घरी त्यानं एक संग्रहालय तयार केले असून त्यांचे दुर्मिळ मूर्ती संग्रह बघण्याची अनोखी संधी मला आज कोरोंना चे निमित्ताने प्राप्त झाली. अप्रतिम सौंदर्य आणि दुर्मिळ मूर्ती संग्रह बघून तर मी सागर भाई यांच्या अधिकच प्रेमात पडलो.

 सागर भाई यांनी त्यांचे व्यावसायिक आयुष्या सोबत त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे म्हणून त्यांचे विशेष कौतुक. त्यातूनच मग पुढे सागर भाई यांनी त्यांच्या कडे असलेले दुर्मिळ कॅमेरा यांचे बाबत माहिती आणि त्यांचा दुर्मिळ संग्रह आणि त्याचे विशेष प्रेम याने मी विशेष मोहित झालो. हे सर्व करीत असताना सागर भाई यांनी त्यांचे संपूर्ण घर दाखवले आणि त्याबद्दलची विशेष माहिती देखील दिली. सकाळी ६.३० वाजता सुरुवात झालेल्या आमच्या प्रवासाला १०.३० कसे वाजले आणि ४ तास कसे संपले हे कळले नाही मात्र एका कलाकाराची आज मला नव्याने ओळख मात्र नक्कीच झाली.


सागर भाई एक सॉलिड कनेक्शन आहे आपल्यात म्हणूनच आपण निसर्गात रमतो आणि निसर्गात भेटतो... ❤️







मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया.... ❤️

सुयोग शहा…

 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 14 ॲड.मंदार भानोसे

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah