व्यक्ती आणि वल्ली !!! अंक - ५ माणूस संस्कारांनी घडतो आणि संस्कार माणसाला घडवतात.

माणूस संस्कारांनी घडतो आणि संस्कार माणसाला घडवतात.

मित्रांनो जीवाला चटका लावणारी आहे ही बातमी. वंदे मातरम् या कार्यक्रमात माझी जयेश क्षेमकल्यानी आणि मनोज कुलकर्णी यांचे सोबत ओळख झाली आणि त्यांचे खांद्याला खांदा लावून काम करणयाची संधी प्राप्त झाली. आज कोरोना चे संकट काळात संघाचे कार्यकर्ते म्हणून कोरोना ने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे अंतविधी व दफनविधी करण्याचे कार्य ते संघाचे कार्य आणि समाजभान असलेले संस्कार यांची जाणीवपुर्वकपणे निस्वार्थी पणे करीत आहेत. परिस्थिती ने बेवारस ठरवलेले मृतदेह यांचे पासून नातेवाईक देखील दूर गेले असताना तुम्ही तुमचे परिवाराची चिंता न करता स्वतः भोसला मिलिटरी स्कूल मध्ये  *Qurantine* होवून या मृतदेहांवर अंत्यसंस्कार  करण्याचे जे कार्य करीत आहात त्याहून अधिक पुण्याचे काम दुसरे काय असू शकते. तुमचे कडे बघून खरोखर तुम्ही देवाचे प्रतीक आहात. शब्द नाही आहेत माझ्याकडे आणि एकदम सुन्न झालो आहे. 


जयेश दादा आणि मनोज दादा मनापासून तुमच्या या कार्याला सलाम आणि मानाचा मुजरा.😊🙏

© सुयोग शहा

Comments

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 13 Dr. Yatindra Dube Sir