व्यक्ती आणि वल्ली –अंक - 10 माझे गुरू श्री. भिडे सर © सुयोग शहा

 

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 10  माझे गुरू श्री. भिडे सर 
© सुयोग शहा 


गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः

गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. वकिलीचा व्यवसाय आणि वकिलीचे शिक्षण असे  क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते. कोणताही कायदा हा पुस्तक वाचून शिकता येत असला तरी त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.  त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला प्रत्येक टप्प्यावर चांगले गुरू मिळत गेले, हे मी माझे भाग्य समजतो.



शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 

“The importance of education is not only in knowledge and skill but it is to help us to live with others.” 

The Most Dynamic,Energetic,Charming,Knowledgeable & Successful Criminal Lawyer and moreover a Very Good Human being I have ever meet in my Life. You are a  Real  Source of Inspiration to all the Generations.  


माझा वकिली क्षेत्रातील प्रवास.

माझा वकिली क्षेत्रातील प्रवास – लॉ-कॉलेज चे शिक्षण पूर्ण झाले आणि शेवटचा पेपर टाकून घरी आलो ते बाबांना म्हणालो उद्यापासून कोर्टात जायचे आहे. कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करावी असे तुम्हाला वाटते म्हणजे सिव्हिल की क्रिमिनल ची प्रॅक्टिस ? बाबांचे पहिले उत्तर म्हणजे आधी वकील तर हो मग बघू पुढे काय करायचे ते....
कोर्टाचा पहिला दिवस संपूर्ण कोर्टात भटकून रात्री घरी आलो तेव्हा लक्षात आले की कॉलेज मध्ये जे शिकलो ते आणि प्रत्यक्षात खूप जमीन आस्मानाचे अंतर आहे. आपण चांगल्या सिनियर कडे गेलो तर आपल्या आयुष्याचे कल्याण होणार आणि काही तरी शिकायला मिळणार.
सुरुवातीला लॉ-कॉलेज मध्ये शिकत असतांना भिडे सर आणि जायभावे सर हे परिचित होते. कारण ते नेहमी वेग-वेगळ्या कार्यक्रमातून कॉलेज मध्ये आम्हाला काही मार्गदर्शन करीत असत आणि दोघेही मोठे यशस्वी वकील असल्याने त्यांची ख्याती होती व आजही आहे.  सुरुवातीला जायभावे सर यांच्या ऑफिस मध्ये जुनिअरशिप साठी अनेक चकरा मारल्या परंतु त्यांच्या बाळू नावाच्या टायपिस्ट ने जायभावे सरांना कधी भेटूच दिले नाही. रोज २ तास बसवून ठेवायचा आणि परत पाठवायचा. याने थोड्या प्रमाणात फ्रस्ट्रेशन देखील आले होते पण जिद्द सोडली नव्हती. त्यानंतर कोर्टाची पायरी चढलो आणि भिडे सरांचे कोर्टात युक्तिवाद ऐकला आणि खूप जास्त प्रभावित झालो.  कॉलेज मध्ये असतांना भिडे सर आम्हाला नेहमी शिकवायला येत असत. बाबांना म्हणालो वकिली करेनं तर भिडे सरांबरोबर फौजदारीची वकिली करेन नाही तर वकिली करणार नाही. पटकन टोकाची भूमिका घेणे हा माझा स्वभाव होता. बाबांनी फार विचारपूर्वक भिडे सरांना फोन केला आणि म्हणाले मुलाने वकिली करेन तर तुमच्या सोबत करेन नाही तर करणार नाही असे म्हंटले आहे काय करू असा प्रश्न विचारला ? भिडे सर म्हणाले असा कोण आहे माझा विध्यार्थी मला त्याला भेटचे आहे, पाठवा त्याला माझ्याकडे. बाबांनी फोन ठेवला आणि पुढच्या अर्ध्या तासात मी भिडे सरांसमोर होतो. सरांनी मला अनेक वेळेस त्यांच्या लेकचर मध्ये बघितले होते पण शहा काकांचा मुलगा म्हणून ती माझी पहिली ओळख होती. कालच परीक्षा संपली आहे आता थोडी मज्जा कर आणि निकाल लागला की ये म बघू असे म्हणाले. सरांना म्हणालो नाही सर मी आजपासूनच येणार आहे,खूप मज्जा करून झाली. सरांनी थोडा विचार करून सांगितले - हे बघ मी तुला शहा काकांचा मुलगा म्हणून ऑफिस ला येण्याची परवानगी देतो पण बाहेरच्या बाकड्यावर बसावे लागेल कारण ऑफिस मधल्या जुनिअर वकिलांना बसायला जागा कमी पडते आहे. अश्या रितेने सुरुवात झाली माझ्या वकिलीच्या क्षेत्राची. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० -९ हे माझे रोजचे नित्यक्रम झाले. माझे व्यवसायातील पहिले गुरु म्हणजे आमचे सर्वांचे लाडके जाधव काका. अर्ज-फाटे कशे लिहायचे आणि कुठल्या कोर्टात कसे काम चालते, त्याचबरोबर संपूर्ण कोर्टाची घटना आणि रचना मला समजावून सांगणारे ते जाधव काका. प्रत्येक खटल्याची अचूक माहिती, पक्षकाराची माहिती, खटल्याचा निकाल, हा जाधव काकांच्या तोंडी पाठ. प्रचंड हुशार आमचे जाधव काका. फक्त डिग्री नाही तर अपिलात सुद्धा युक्तिवाद करायला कमी पडणार नाही ते डी.जे कडे असे आम्ही नेहमी म्हणायचो.


माझा पहिला कोर्टातील अर्ज ऑफिस मध्ये बघितल्यानंतर भिडे सरांचे सर्व त्यावेळचे जुनिअर व माझे सहकारी आणि जाधव काका माझे अक्षर चांगले असल्याने सर्व अर्ज माझ्याकडूनच लिहून घेत असत आणि मला देखील खूप मज्जा येत असत. माझे त्यावेळचे सिनियर म्हणजे महेश पाटील सर ज्यांच्या बरोबर थांबुन त्यांना अस्सीस्ट करायचे असे मला भिडे सरांनी सांगितले होते. एखादी गोष्ट सांगितली आणि ती पटली कि त्याचे तंतोतंत पालन करायचे हा माझा स्वभाव. प्रामाणिकपणे जे हि काम मिळत असे, जो ही कोणी सांगत असे ते मी १००% कुठलाही कंटाळा न करता करीत असे. अक्षर चांगले आणि लिखाणाचा स्पीड चांगला असल्याने अनेक वेळेस डिक्टटेशन ची संधी मिळू लागली आणि त्याचबरोबर सर पक्षकाराकडून माहिती घेत असत त्यावेळेस त्या केस विषयी बराचसा तपशील माहित होत असत. प्रत्येक वेळेस सरांबरोबर प्रेत्येक केस ची तयारी म्हणून स्पॉट बघण्याची संधी प्राप्त होत असे. 

सर रोज नियमितपणे सर्व केसचा आढावा सर्व जुनिअर कडून घेत असत आणि दुसऱ्या दिवसाच्या कामाकरिता मार्गदर्शन करीत असत. ऑफिस मध्ये काय, कसे काम करायचे तो तपशील जाधव काकांकडून शिकलो आणि त्याच बरोबर माझे त्यावेळचे सहकारी महेश पाटील सर, मंदार भानोसे, परीक्षित पटवर्धन, हे माझे चांगले मित्र सुद्धा झाले.  प्रेत्येकाची काम करण्याची एक वेगळीच शैली होती आणि आहे. भिडे सर हे नाशिक जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फौजदारी क्षेत्रातील एक मोठे नाव असल्याने आम्हाला प्रेत्येक कोर्टात आदरपूर्वक वागणुक मिळत असे आणि कोर्ट डेकोरंम कसे ठेवायचे याचे मार्गदर्शन सरांकडून वेळोवेळी मिळत असे. महत्वाचे म्हणजे जज साहेबांची भिडे साहेबांचे जुनिअर म्हणून खूप अपेक्षा असायच्यात आमच्याकडून. भिडे साहेबांचे जुनिअर आहेत ना मग ब्रिफ चा अभ्यास करून आले असाल हा पक्का समज. अनेक वेळेस ते केस चालवण्याचा आग्रह धरत असत आणि काही चुकलेच तर मी भिडे साहेबांकडून उर्वरित माहित घेईन असे देखील सांगून आम्हाला प्रोत्साहित करीत असत. 
भिडे सरांच्या ऑफिस मध्ये जितके एक्सपोजर नवीन वकिलांना मिळते,केस चालवण्याची संधी प्राप्त होते आणि त्याच बरोबर जितके मार्गदर्शन मिळते ते फार कमी ऑफिस मध्ये पाहायला मिळते. सरांनी ऑफिस मध्ये बसायला जागा नाही हे मिश्कीलपणे जरी म्हंटले होते पण कधीच बाहेर बसायला नाही लागले. सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्यात जागा दिली आणि मी त्यांच्या मनात माझी जागा निर्माण केली. आज हि मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये असलेली कोणतीही अडचण घेऊन सरांकडे गेलो किंवा माझ्या सहकाऱ्यांकडे गेलो कि मला योग्य ते मार्गदर्शन मिळत असते. भिडे सरांबरोबर २ वर्ष त्यांचा जुनिअर म्हणून काम करीत असतांना सतत त्यांच्या सावली सारखा त्यांचे सोबत असायचो आणि जास्ती जास्त सरांकडून शिकण्याचा प्रयत्न करीत असायचो. या दोन वर्षाच्या कार्यकाळात सरांनी मला अनेक वेळेस माझ्या बाबांची प्रक्टिस आणि प्रॉपर्टी चे क्षेत्रात वकिली करण्यास प्रोत्साहित केले पण मला काही करून प्रॉपर्टीचे क्षेत्रात आणि बाबांची असलेली कन्वेयंसिन्ग ची प्रॅक्टिस अजिबात करायची नव्हती. दोन वर्षानंतर ज्या माझ्या बाबांच्या एका शब्दावर सरांनी मला त्यांच्या ऑफिस मध्ये ठेवून काम शिकण्याची आणि करण्याची संधी दिली होती ते माझ्या सोबत सरांकडे त्यांच्या घरी आले आणि मी स्वतंत्र प्रॅक्टिस करू इच्चीतो हे सांगून सरांची परवानगी घेतली. खूप आनंदाचा क्षण होता तो माझ्यासाठी आणि सरांसाठी देखील कारण त्यांनी मला अनेक वेळेस यासाठी प्रोत्साहित देखल केले होते. 

तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मी आज जे काही थोडे फार नाव आणि यश माझ्या क्षेत्रात तयार केले आहे त्यात काणे सरांचा, बाबांचा आणि भिडे सरांचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ इच्छित नाही आणि म्हणूनच मला आज 20 वर्षांपासून भिडे सरांचे कोणतेही काम पहिल्या पसंतीने आणि आवडीने करायला मनापासून आवडते. भिडे सरांचे बार कौन्सिल चे इलेक्शन असो किंवा बार कौन्सिल चे अध्यक्षपद असो त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून एकत्रपणे संपूर्ण महाराष्ट्र आत्तापर्यंत ३ वेळेस पिंजून काढला आहे आणि ते करत असतांना कधीही उत्साह कमी पडलेला नाही. नुकतेच २०२० मध्ये भिडे सरांचे बार कौन्सिल चे अध्यक्षपदाचे कार्यकाळात ऐतिहासिक अशी राज्यव्यापी वकिलांची परिषदचे नियोजन करण्यात आले आणि भारताचे १३५ वर्षांचे इतिहासात पहिल्यांदा भारताचे सरन्यायाधीश श्री. शरद बोबडे साहेब नाशिकला आले. या राजव्यापी वकिलांची परिषदचे नियोजन समिती तसेच अनेक महत्वाच्या जवाबदाऱ्या मी, तन, मन आणि धन याने यशस्वीपाने पार पाडण्यात माझे योगदान दिले आणि त्याचे खूप छान पणे मला गौरवण्यात देखील आले. प्रचंड मेहनत घेतली आणि हि राजव्यापी वकिलांची परिषदचे कार्यामध्ये स्वतःला संपूर्ण पणे झोकून घेतले.



आजही मी भिडे सरांबरोबर अनेक कार्यांमध्ये सक्रिय असतो त्यांच्या घरातील एक सदस्य म्हणून माझी छोटीशी ओळख देखील आहे. आज मी जी काही माझी छोटीशी प्रॅक्टिस प्रॉपर्टी व रेजिस्ट्रेशन चे क्षेत्रात करीत आहे त्याची मनापासून इचछा कधीच नव्हती, पण एक सवय मला छान आहे आणि ती म्हणजे जे काही करायचे ते अगदी मनापासून करायचे आणि त्यासाठी आपले ११०% योगदान द्यायचे. अनेक ठिकाणी मी भिडे सरांबरोबर असतांना ते माझी ज्याप्रकारे ओळख करून देतात ते दोन प्रेमाचे शब्द खूप छान असतात. वकिली व्यवसायात किती यश मिळाले हे मी सांगण्यापेक्षा आज पर्यंत जे काही काम केले ते प्रामाणिकपणे केले आणि कोणाला देखील आजपर्यंत फसवले नाही आणि लुबाडले नाही याचे बद्दल अभिमान आहे. आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलो तर देव कधीच कामाची कमी पडू देत नाही असे भिडे सर अनेक वेळेस सांगत असत. व्यवसायात प्रामाणिकपणे काम करून चांगले नाव आणि प्रतिष्ठा कमावता येते हे देखील मी या सर्वांकडून शिकलो आहे आणि त्याचीच प्रचिती मला रोज माझ्या दैनंदिन आयुष्यात येत असते. 


माझे कायदे विषयक पुस्तकाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र  गोवा यांचे मार्फत मान्यता मिळून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र  गोवाचे ऑफिस मध्ये प्रकाशन सोहळा.


गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना माझे वंदन…!!

© सुयोग शहा



Comments

  1. खूप खूप छान...

    ReplyDelete
    Replies
    1. सुयोग शहा सर आपले मनापासून अभिनंदन। अश्या प्रकारे आपण भिडे सरांच्या ऋणात आहात हे वाचून आपण आपली उंची अधिक वाढवली आहे आपणही हा वसा पुढे चालू ठेवावा ही विनंती।

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 13 Dr. Yatindra Dube Sir