व्यक्ती आणि वल्ली –अंक - 12 Dr. Manohar Jadhav Sir (MJ) 29/06/2021


व्यक्ती आणि वल्ली –अंक - 12 
 © सुयोग शहा 

मनोहर  सरांना  भटकंतीचा त्याच सोबत फोटोग्राफीचा देखील छंद आहे आणि ते त्यांचे व्यावसायिक कार्यातून वेळ काढून तो छंद जोपासत असतात.


आनंद हा फुलपाखरासारखा असतोत्याच्या मागे लागले की तो दूर पळतो  निवांत बसलो की तो अलगद आपल्याखांद्यावर येऊन बसतोखरंचआनंदाचं हे असंच असतंभूतकाळातला मनस्ताप  भविष्यकाळातली चिंता केली की तो भुरकन उडून जातो मात्र वर्तमान काळात राहिले की आपल्या जवळ येऊन बसतोअमूक एक वस्तू मिळलीकी मी आनंदी होईन या आपल्या सवयीमुळे आपण आयुष्यभर आनंदापासून  वंचित राहतोआयुष्यभर आपण   आनंदला आपल्यापासून क्षणोक्षणी पुढे ढकलत असतो जसे की शिक्षण पूर्ण झाल्यावरमनासारखी नोकरी मिळाल्यावरलग्न झाल्यावरमुले झाल्यावरनिवृत्त झाल्यावर खूप आनंदानी जगेनपण आता मात्र खूप पैसा कमावेन या सबबीखाली आपलं संपूर्ण आयुष्यच निघून जातं  आपण जीवन जगण्याच्या शर्यतीत आनंदाला आपल्या सोबत घ्यायचे विसरुनच जातोम्हणूनच आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात घालवायला पाहिजेजेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतोअपेक्षारहित जगतोनिष्काम कर्म करतोईश्वरीय सानिध्य प्रत्येक गोष्टीत अनुभवतोसमाधानी वृत्ती बाळगतो,   प्रत्येक परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवतोइतरांशी अनावश्यक स्पर्धा टाळतोक्षमाशील असतो  दुसऱ्यांसाठी जगतो तेव्हा आपल्याला जीवनात आनंद मिळत जातो. 








उगवत्या सूर्याला आनंदाचा अर्घ्य दिला की मावळताना तो खूप समाधान देऊन जातो. खरंतर, आनंद हा विनामूल्य मिळतो पण आपल्याला आयुष्यभर त्याचा पत्ताच नसतो. फुलपाखरु प्रत्येक फुलातून मधुकण गोळा करीत असतो तसेच आपण सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक कमार्तून आनंद वेचला, प्रत्येक परिस्थिती मध्ये आनंद शोधला व चिंता करण्यापेक्षा चिंतन केले म्हणजे आपण आनंदानी भरभरून जावू यात काहीच शंका नाही. 




 
माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जीवनाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे उदात्त, सतत खळखळणारे लहान मुलांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत.. अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनीय आहे.


मैं ज़िन्दगी का साथ निभाता चला गया... हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया.... ❤️



I would love to be very Honest…

Many of us buy our expensive camera to take photos on Auto mode forever. Actually we are smarter than our camera. So why let it make all the decisions for us ?

After going through the Mobile Photography of Dr. Manohar Sir you could be taking jaw-dropping photos that leaves all of us speechless !!!

Now, if you’re like most people, you bought your digital camera because you wanted to take high-quality photos. And you wanted to capture the moments that really matter to you.
But you probably didn’t expect that your digital camera would be THAT complicated just follow the tips from Dr. Manohar Jadhav Sir.

© सुयोग शहा 

Comments

  1. Superbbbbbbbbb Manohar Sir, I m coming to take photography lessons from you👏👏👏👏👏

    ReplyDelete
  2. सुयोग अभिनंदन छान ब्लॉग लिहिला आहे , मनोहर सर् यांच्या वर ।

    ReplyDelete

Post a Comment