व्यक्ती आणि वल्ली !!! अंक -३ श्री.योगेश कासार पाटील व सौ.स्मिता कासार पाटील यांच्या संकल्पनेतून प्राचीन सुंदर नारायण मंदिर १७५६ - २०२०
व्यक्ती आणि वल्ली !!!
श्री.योगेश कासार पाटील व सौ.स्मिता कासार पाटील
आज दिनांक ०९/०६/२०२० रोजी आर्किटेक्ट श्री. संजय पाटील सर आणि आर्किटेक्ट श्री.सागर काबरे यांचे सोबत सकाळी ६.३० वाजता भटकंतीची सुरुवात केली. सुरुवातीला प्लॅन होता तो गोदा पार्क येथे जाऊन निसर्ग सौंदर्य बघायचे आणि त्यानंतर श्री सुंदर नारायण मंदिर येथे जाऊन त्याचे सुरु असलेले संवर्धन व जीर्णोद्धार याची प्रत्यक्ष माहिती घेण्याची. छंद जोपासण्याचे दृष्टीने सुरु असलेला हा आणखी एक छोटासा प्रयत्न होता आणि निसर्गाविषयी असलेले आकर्षण आणि प्रेम यातुनच आजचा ठरलेला हा सागरभाईंचा प्लॅन होता. प्लॅन तसा अगदी सहज ठरला होता आणि लॉक डाउन असल्यामुळे विशेष चर्चा करायची नाही हे देखील निश्चित होतेच. हजारो पक्षांचा किलबिलाट,नदीचे अप्रतिम सौदर्य बघत बघत आम्ही तिघेच पोचलो गोदापार्क वर आणि सुरुवात झाली आमच्या आजच्या प्रवासाची.
पावसानंतर आज ( थोड्या प्रमाणात ) खूप घाण आणि कचरा देखील होता पण आवड असली कि सवड निघते आणि त्याचप्रमाणे मार्गक्रमण करीत करीत आम्ही आमची गोदापार्कची आजची नियोजित चक्कर सार्थ ठरवली. त्यानंतर गोदा पार्क मधून आम्ही तिघांनी प्रयाण केले ते श्री सुंदर नारायण मंदिर येथे. तेथे पोचल्यानंतर आमची भेट झाली इंजिनीयर श्री. योगेश कासार पाटील व त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट सौ.स्मिता कासार पाटील यांचे सोबत आणि त्यानंतर आम्हाला आर्किटेक्ट अनघा देखील जॉईन झाली. मंदिराचे दुरुस्ती व नूतनीकरण आणि जीर्णोद्धार हा संपूर्ण विषय हा माझ्यासाठी नवीनच होता पण आज नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला मिळणार याची १००% खात्री आणि विश्वास होता. नाशिक मध्ये गेल्या ४० वर्षणासून राहत असून देखील मी कधी श्री सुंदर नारायण मंदिरात आलो नसल्याची माझी खंत आज मात्र पूर्ण झाली.
नाशिकमधील अनेक पुरातन मंदिरांनी वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे वेगळेपण जपले आहे. श्री सुंदर नारायण मंदिर हे त्यापैकीच एक असून, नाशिकच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्यासाठी या मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. श्री सुंदर नारायण मंदिराचाही त्यात प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता राज्य सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरु असून त्यादृष्टीने कार्यवाहीस प्रारंभ देखील गेल्या ३ वर्षांपासून झाला आहे. नाशिक शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या प्राचीन सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाने या प्राचीन व ऐतिहासिक वास्तुला पुनर्वैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
नाशिक शहराच्या मध्यवस्तीत रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर पुलाला लागूनच असलेले श्री सुंदर नारायण मंदिर सन १७५६ च्या सुमारास बांधले गेले आहे. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी हे मंदिर त्या काळात जवळपास १० लाखांत बांधले आहे. उत्तम बांधणी आणि विविध शिल्पकृतीमुळे हे मंदिर वेगळेपण टिकवून आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड, चुना, शिसव, नवसागर आदी साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे.या मंदिराच्या शिखराची उंची ५० ते ५५ फूट असून, त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
सध्या मंदिराचा कळस उतरवून त्यावर काम सुरू झाले आहे. एक दगड मंदिराच्या रचनेप्रमाणे तयार करण्यासाठी साधारणत सहा दिवसांचा कालावधी लागतो. हा सर्व भाग धोकेदायक झाला असून तो मूळ स्वरूपात बांधणे गरजेचे होते. त्यामुळे अशा ऐतिहासिक सुंदर नारायण मंदिराची दुरुस्ती व नूतनीकरण व्हावे यासाठी पुरातत्त्व खात्याच्या नियोजनानुसार इंजिनीयर श्री. योगेश कासार पाटील व त्यांच्या पत्नी आर्किटेक्ट सौ.स्मिता कासार पाटील करीत आहेत.
सुंदर नारायण मंदिराची बांधणी पाषाणात आहे. महाराष्ट्रात अशी पाषणातील मंदिरांची संख्या कमी आहे. दक्षिणेकडे अशीच मंदिरे असल्याने या मंदिराच्या बांधकामासाठी कारागीर आणि ठेकेदार दक्षिणेतून आले आहेत. त्यांना या मंदिर बांधकामाचा सराव असल्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने दगडावर त्यांचा हात सुरू असतो. सध्या परिस्तिथीत कोरोना चे निम्मिताने मंदिराचे दुरुस्ती व नूतनीकरण काम बंद आहे पण लवकरच दिवाळी नंतर ते सुरु देखील होणार असल्याची माहिती श्री. योगेश कासार पाटील यांचे कडून मिळाली. सद्यस्थितीत झीज आणि अन्य कारणाने धोकादायक स्थितीत पोहचल्याने पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कामास सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र सरकारकडून १५ कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून सहा महिन्यापूर्वी प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. जवळील एका इमारतीत सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले आहे. श्री सुंदर नारायण मंदिराचे दुरुस्ती व नूतनीकरण तसेच जीर्णोद्धार याबाबत हि संपूर्ण माहिती आम्हाला श्री. योगेश कासार पाटील व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता कासार पाटील हे वेळोवेळी देतच होते. उत्कृष्ट असा हा आजचा विलोभनीय अनुभव होता.
श्री. योगेश कासार पाटील व सौ.स्मिता कासार पाटील यांचे विशेष कौतुक आणि त्यांची जिद्द, चिकाटी आणि या कार्याला मनापासून सलाम.
© सुयोग शहा
सुयोगभाई अप्रतिम
ReplyDeleteतुम्हाला मानले इतक्या थोड्या वेळेत तुम्ही काय छान लिहिले।। आताच जाऊन आलो आणि तुमचा लेख आणि सुंदर फोटोग्राफी तयार ।।कमाल आहे ।।
अभिनंदन
छान माहिती
धन्यवाद 🙏
Deleteसुयोग मला निरोप दिला नाही , मि पण नदि पलीकडे होतो । पुढच्या भेटी ची अपेक्षा ठेवतो । छान माहिती दिली , त्याचे आभार ।
ReplyDeleteनक्कीच पाजी 🙏
Deleteसुयोग thanks for the apt description... Special thanks to yogesh n smita 👌👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteSuyog really inspiring words from you.How You do all this write up Great.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखुपच छान माहिती आणि फोटोग्राफस स्मिता आणि योगेश सर यांचे खुप कौतुक! तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखरच खुपच छान माहीती दीली आहे मंदिराचा जीर्णोद्धार होण फार गरजेच होत अशी बरेच मंदिर आहेत नासिक मध्ये त्यांचे बद्दल ही विचार करावा,,सुयोग शहा सर आपण ही माहीती दीले खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन धन्यवाद
ReplyDeleteआपले मित्र,
संजय पोतदार,