व्यक्ती आणि वल्ली – अंक -७ निसर्गाच्या सानिध्यात आर्कीटेक्ट श्री.संजय पाटील सर

व्यक्ती आणि वल्ली – अंक -७

निसर्गाच्या सानिध्यात आर्कीटेक्ट श्री.संजय पाटील सर यांचे सोबत.

 

Nesting in Nature is The Sweetest Gift to explore and full of memories to cherish.....

 

आपल्या असामान्य कार्याने जगाला आपली दखल घ्यायला लावणारे,नाशिकचे अनमोल रत्न असलेले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले अष्टपैलू संजय सर. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक 'बहुरंगी', 'बहुढंगी' माणसं आपल्याला भेटतात. पण सामान्यांच्या आयुष्यातील या असामान्य माणसा बाबत त्यांच्या आयुष्याचा हाच प्रतिभावान प्रवास उलगडताना, त्यांच्या आयुष्याच्या  प्रवासा विषयी जाणून घेतांना असे लक्षात येते की... 

Life is all about Passion and Passionate People...

  

संजय पाटील सरांनी पेठे विद्यालय मराठी माध्यमातून उत्तीर्ण झाल्यावर सायन्स घेऊन पुढे इंजिनीयरिंग किंवा मेडिकल करावं या हेतूने पी डी सायन्समध्ये ऍडमिशन घेतली. त्याच वेळेस आर्किटेक्टचर हा आर्ट व सायन्स संमिश्र अभ्यास असलेला कोर्स चांगला पर्याय म्हणून निवडला. सुदैवाने मुंबईतील जे जे कॉलेज मध्ये अर्किटेक्टचरचे संपूर्ण शिक्षण पूर्ण करून नशिकला परत आले. संजय पाटील सरांनी वास्तुकलेची पदवी पूर्ण केल्यावर पुढे कुठल्यातरी मोठ्या शहरात चांगल्याशा फर्ममध्ये काम करण्याचा व अनुभव घेऊन मग नाशिकला येण्याचा त्यांचा मानस होता. नाशिकला परत येऊन सुरूवातीला साधारण तीन महिने नाशिकच्या सुप्रसिद्ध आर्किटेक्चरल फर्म असोसिएटेड आर्किटेक्टस अँड इंजिनियर्स’ मध्ये त्यांनी काम केले.  जीवनातल्या विसंगत अनुभवांना विनोदी शैलीनं इतरांना जे अशक्यते मला शक्यएवढीच जिद्द आयुष्यभर जोपासणा-या आर्कीटेक्ट संजय पाटील सरांचे पहिले व्यवसायातले गुरू म्हणजे शिर्के मिस्त्री.   


आज पर्यंत संजय सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.




संजय पाटील सरांना ओळखीच्यां मधून काही छोटी कामे करण्याचा योग येत गेला आणि त्यात आर्किटेक्चरल कन्सल्टन्सीची सुरुवात केली. वास्तु रचनेत नुसती वापराच्या दृष्टीने रचना करावयाची नसून त्यात योग्य ती वातावरण निर्मिती असली पाहिजे, त्याचे निसर्गाशी नाते असले पाहिजे हे कॉलेजमध्ये वास्तुशास्त्र शिकतांना मिळालेले संस्कार व त्यातूनच फर्मचे नाव इनव्हायरन प्लॅनर्सहे दिले. संजय सरांनी त्यांच्या व्यावसायिक कार्यातून नाशिकचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले, तसेच त्यांचे आर्किटेक्चर क्षेत्रा मधील महत्वाचे मानले जाणारे आगाखान अवॉर्डकरीता  नॉमिनेशन झाले. 

  


साधारण १९९३ मध्ये महिंद्र अँड महिंद्र कंपनीचे नाशिकच्या गेस्ट हाऊसचे प्लान  बनविण्यात आले. पुढे श्री आनंद महिंद्रा यांनी कंपनीचे एम. डी. म्हणून जवाबदारी स्वीकारली. नाशिक मधील 'व्हिजन २०-२०' या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ताज हॉटेलच्या लॉबीत उभे असताना हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तक्रार स्वरूपात विचारले कि "सध्या ताज मध्ये कंपनीचे कमी लोक उतरतात" तेंव्हा थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या संजय सरांकडे बोट दाखवून आनंद महिंद्रांनी  त्यांना उत्तर दिले " हे जबाबदार आहेतयांनी आमच्या करिता नाशिकला 'महिंद्रा हाऊस' या स्वरूपात ताजमहाल केला आहे " या पेक्षा दुसरी कुठली ती चांगली पावती असावी असे संजय सरांनी त्यांचे एका लेखनातून भावना देखील व्यक्त केली आहे...

"महिंद्र इन्स्टिट्यूट ऑफ क्वालिटी " हा व्यावसायिक प्रोजेक्ट देखील संजय सरांच्या संकल्पनेतून त्याचे डिझाईन तयार झाले. तेथील लँडस्केप देखील पूर्ण पणे वेगळे व फॉर्मल स्वरूपाचे केलेले आहे. पुढे २००६ साली कंपनीचे त्यावेळी एम. डी.व व्हाइस चेअरमन असलेले आनंद महिंद्र यांना त्यांचे विमानास उशीर झाल्याने नाशिकला थांबावे लागले व इन्स्टिट्यूट मध्ये राहण्याचा योग आला. तेव्हा त्यांनी व्हिजिटर बुक मध्ये लिहीलेली प्रतिक्रिया ही संजय सरांचे सर्व टीम करिता दुसरी पावतीच होती. "आयुष्यात काही चांगल्या गोष्टी अपघातानेच घडतात, मला आज या निमित्ताने अनुभूती आली की महिंद्र  मॅनेजमेन्ट डेव्हलपमेंट सेन्टर (बोधिवृक्ष) व महिंद्र इन्स्टिटयूट ऑफ क्वालिटी ह्या खऱ्या अर्थाने 'सेन्टर ऑफ एक्सलन्स' झाल्या असून जागतिक दर्जाची  वातावरण निर्मिती झाली आहे. संजय सरांनी काळजी पूर्वक केलेले डीटेलिंग, सौंदर्याची योग्य जाण व प्रसन्न वातावरण ही या इन्स्टिट्यूट्स ची ओळख झाली आहे व या निमित्ताने खऱ्या अर्थाने अभिमानास्पद वाटावी अशी निर्मिती केली आहे.


तात्यासाहेब (कुसुमाग्रज) ज्ञानपिठ पारितोषिक मिळाल्या नंतर तात्यांनी कुठलेही पारितोषिक स्विकारायचे नाही तसेच जाहिर व्याख्यान द्यायचे नाही असे ठरवले. तर त्यांच्याच संकल्पनेतुन कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली.  प्रतिष्ठानाच्या माध्यमातुन साहित्यतसेच कला साहस समाजसेवा या विषयात अनुक्रमे जनस्थानगोदावरी गौरवपुरस्कार प्रत्येकी वर्षांआड देण्याचे ठरले. तात्यांच्या सहवासात त्यांच्या स्वभावाचे अनेकविध पैलु व मोठेपणा समजला. संवेदनशील माणुस म्हणुन अधिक चांगली ओळख झाली. तात्यांच्या निधना नंतर प्रतिष्ठानाच्या विश्वस्तांनी शासन तसेच लोकसहभागातून स्मारक करावयाचे ठरविले. विश्वस्त हेमंत टकले , विलास लोणारी आदींनी पुढाकार धेऊन शासन व महानगर पालिकेकडुन जागा व काही निधी उपलब्ध केला. स्मारक लोकउपयोगी करावे व त्यात कुठल्या गोष्टींचा समावेश असावा या वर चर्चा झाली.स्मारकाचे डिझाइन करतांना, स्मारक हे कुठलाही बडेजाव नसलेले परंतु लोकउपयोगी व तात्यांच्या स्वभावाशी सुसंगत असे असावे. तसेच ते महानगर पालिकेच्या नकाशातील मुळ उद्देशास  (पब्लिक स्पेस )धरून असावे. त्यातुनच ते अर्थ शेल्टरस्ट्रक्चर करावयाचे ठरले. छतावर हिरवळ असलेला बगीचा तसेच जागेवर असलेल्या झाडांचा वापर करतांनाच जागेला असलेल्या उताराचा सन्मान राखणे ह्या देखील डिझाइन मधील महत्त्वाच्या बाबी होत्या. हिरवळीतून नागमोडी वळणाची दगडी फरसबंद वाट व दुर्तफा जिवनदर्शन, वाचनालय , सभागृह, आर्ट गॅलेरी , अभ्यासिका  संगीत व नाटक प्रशिक्षण वर्ग आदी  दालनांचे आयोजन. वाटेत उतारा नुसार लागणार्या र्स्टेपसचा अ्मफीथीएटर म्हणुन वापर तसेच त्या सोबत जाणारा डिसेबल फ्रेंडलि मार्ग.

स्मारकाच्या प्रवेशास तात्यांना आवडणारी कदंब वृक्षे व त्या भोवती बसावयास कट्टा . व त्या पुढे थोडे खाली उतरून त्यांना भावणार्या डाकबंगल्याचे प्रतिक असलेली कौलारु छताची कॅनोपीची योजना संजय सरांनी त्यांचे संकल्पनेतून केली. छतावरील दोन्ही बाजुंचे बगीचे पुलांमुळे  साधले गेलेत. जेव्हा छतावरील बगीचात मुले खेळतांना दिसतात, सिनीयर सिटिझन्स यांचे गितापठण, हास्य वर्ग, कदंबाच्या कट्ट्यावर रंगणाय्रा  गप्पा. वाचनालयातील लोकांची रेलचेल, सभाग्रुहातील विवीध सांस्कृतीक कार्यक्रम, अभ्यासिकेतील  गरजू विद्यार्थीची गर्दी, संगीताचा रियाज करणारे विद्यार्थी ,आर्कीटेकचर व चित्रकला महाविद्यालयांचे  नागमोडी रस्ताचा कल्पक वापर करून केलेली वार्षिक प्रर्दशने..... हे सर्व बघतांना स्मारकचा वापर योग्य उदीष्ठ पुर्ती ने होतो याचे संजय सरांना आत्मिक समाधान मिळते.


कुसुमाग्रज स्मारकाच्या प्रकल्पाला प्रतिष्ठीत जे.के. ग्रीन बिल्डिंग हे अंतर राष्ट्रीय कॅटेगीरीतील अर्कीटेक्ट ऑफ दी इयर ‘ अवॉर्ड मिळाले. अश्यारीतीने कुसुमाग्रज स्मारकाच्या रुपानेआपल्या व्यवसायाच्या माध्यमातुन सामाजिक बांधिलकी पाळण्याची संधी मिळणे ह्या पेक्षा दुसरे ते कुठले चांगले भाग्य असावे असे देखील संजय सरांचे मत आहे.

        नाशिक शहराचा वाढत लौकिक तसेच समस्त नाशिक करणसाठी आपल्या कार्याने, कर्तृत्वाने नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे वास्तुविशारद संजय पाटील सरांना "नाशिक भूषण"  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांचे हस्ते व निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार  यांच्या प्रमुख उपस्तिथीत दिनांक ०७/०३/२०१६ रोजी या पुरस्काराने संजय सरांना सन्मानित करण्यात आले.

  


संजय सरांचे काही वाक्य मला खूप आवडते आणि ते म्हणजे – 

Architecture to me is not a mere profession; to me it's a passion, a reflection of myself. 


I think the future is about sustainable design.


I have no special talents. I am only Passionately curious.

एखाद्या चांगल्या शैक्षणिक संकुलाचे डिझाईन करायला मिळणे हा आर्कीटेक्टच्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा व नशिबाचा भाग असतो. तशी संधी संजय सरांना नाशिक मधील "भुजबळ नॉलेज सिटी" असो किंवा "संदीप फ़ाउंडेशन" चे डिझाईन करण्याच्या निमित्ताने मिळाली. साधारण २००० साली मुंबई येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था " मुंबई एज्युकशन ट्रस्ट " यांनी नाशिक येथे कॉलेज कॉम्प्लेक्स करावयाचा ठरविला व त्या करीता त्यांनी आडगाव शिवारात सुमारे ३३ एकर जागा घेतली.  २००७ मध्ये त्याचे भव्य उदघाटन भारताचे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांचे हस्ते झाले व संजय सरांचा खास सत्कार देखील झाला.

 

संजय पाटील सरांचे महिरावणी  येथील त्यांचे फ़ार्म हाऊस हा म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे.  जमीन व्यवसायातील श्री. मामा जोगळेकर यांचे सहकारी कोडांजी मिस्तरीने महिरावणी मायनर एरिगेशन डॅम’ च्या भिंतिवरून शेवटी जाऊन पलिकडे असलेली जमीन दाखवली. जागेचे लोकेशन हवे तसे असल्याने तसेचमुख्य रस्त्यापासुन दूर, पाण्यालगत व शहराच्या जवळ फ़ार्म हाउसची पूजा  १५  ऑगस्ट २००४ या दिवशी केली. फार्महाऊस हे कुटुंबासाठीफक्त करमणुकी करिता नसुन संवादचर्चाकार्यशाळाभाषणे ,संगीत व अभिवाचन् आदी कार्यक्रमांकरीता संजय पाटील सर करीत असतात याचा विशेष आनंद होतो. या प्रकल्पाला वास्तुकलेतील महत्वाची अँवाँर्डस मिळाली. २०१६ साली पर्यावरणा करीता, किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार मिळाला. 

   

त्याच सोबत महिरावणी येथील त्यांचे फ़ार्म हाऊस येथे ज्यांनी झाडे लावलीत व जीव लावुन वाढवली अश्या जगन व विलास यांच्या सोबत पुरस्कार स्वीकारताना संजय सरांना विशेष आनंद झाला.


नाशिक हे वाइन टुरिझम करिता देशभरात प्रसिद्ध झाले आहे. सुला वाईन व नाशिक हे एकमेकांचे प्रतिशब्द झालेले आहेत. नाशिकच्या वाइन टुरीझमची मुहुर्तमेढ तेंव्हा रोवली गेली. महिंद्र आणि महिंद्र कंपनीचे एम डी .आनंद महिंद्र  एका लग़्ना निमित तेथे मुक्कामास थांबले असतांना त्यांनी लिहीलेली व्हिजीटर बुक मधिल नोंद कायमच उत्साह वर्धक व प्रोत्साहीत कारणारी आहे. रिसाॅर्ट बियाॅन्ड हे खरोखरीच अपेक्षेपलीकडील आहे. साधे व पर्यावरण पुरक सौंदर्य हे निश्चितच भारतीय टुरिझम करीता पथदर्शक ठरणारे असणार आहे



 


संजय सरांना
  भटकंतीचा त्याच सोबत फोटोग्राफीचा देखील छंद आहे आणि ते त्यांचे व्यावसायिक कार्यातून वेळ काढून तो छंद जोपासत असतात. अनेकवेळेस तर सर साईट विसीट साठी किंवा त्यांचे महिरावणी येथील फार्म वर देखील 
 सायीकल वर जात असतात.


संजय सरांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे वाचन करण्याची संधी मिळणे आणि त्यातून आणि त्यांच्या कार्याविषयी मी अजून प्रभावित झालो.आज संजय सरांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी लिहण्याचे मला भाग्यच प्राप्त झाले आहे. 

 


संजय पाटील सर यांच्या सोबत आमच्या ग्रुपचे मित्रांसोबतच्या कृषी नगर ट्रॅक वरील काही आठवणी.  


 Sanjay sir Nesting in Nature is really something special and with all your special talents....

I am sincerely & passionately in love with all your projects published in this Book.

Love your passion & Special talents...

 ©️ सुयोग शहा


 



 




 








 

 


Comments

  1. Beautifully written blog! Still a feeling of incompleteness in the story... shows the expanse of the personality... that he is ... Ar. Sanjay Patil Sir!
    Just an incredible person... he is an inspiration to many!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिखाण आहे। अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 13 Dr. Yatindra Dube Sir